बझिलिक ऑफ बॉम जिजस, ओल्ड गोय (गोआ)
बझिलिक ऑफ बॉम जिजस, ओल्ड गोय (गोआ)
हे गोव्यातले (गोयचे) सर्वात सुप्रसिध्द आणि सुंदर चर्च आहे. बझिलिक या शब्दाचा अर्थ "दुतर्फा खांबांची रांग आणि अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन रोममधला लांबट आकाराचा दिवाणखाना" असा होतो. साधारण अशीच रचना या चर्चची आहे. चर्चच्या बांधकामास २४ नोव्हेंबर १५९४ला सुरुवात झाली होती. बांधकाम पूर्ण व्हायला अंदाजे ११ वर्षांचा कालावधी लागला. या चर्चमध्ये सेंट फ्रांन्सीस झेविअर यांचे अवशेष ठेवले आहेत. चर्चचे बांधकाम मजबूत असून त्यासाठी काळ्या लेटराइट दगडाचा वापर करण्यात आला आहे. या चर्चचा पुढचा मुख्य भाग चार भागांमध्ये विभागला आहे. सर्वात खालच्या भागात तीन भव्य दरवाजे आहेत. त्याच्या वरच्या म्हणजे दुसऱ्या भागात तीन विशाल चौकोनी खिडक्या आहेत. तिसऱ्या भागात गोलाकार खिडक्या आहेत. सर्वात उंचावर आणि चौथ्या भागात नक्षीदार चौकोन आहे.
जाण्याचे मार्ग -
रेल्वे- गोआ कोकणरेल्वेने दिल्ली,मुंबई,राजकोट,एर्नाकुलम,हैद्राबाद आणि चैन्नाईशी जोडले गेले आहे.
विमानसेवा- पणजीपासून सुमारे ३० कि.मी.वर दभोली विमानतळ आहे. या विमानतळावर दरदिवशी मुंबई,पुणे आणि दिल्लीवरुन विमाने येतात. येथे प्रीपेड टॅक्सी उपलब्ध आहे.

0 comments:
Post a Comment